# पृथ्वीचाच मानवावर हक्क आहे मानवाचा पृथ्वीवर हक्क नाही
पृथ्वीवर आपला हक्क नाही पृथ्वीचाच आपल्यावर हक्क आहे.
हो खरं वाचताय तुम्ही. पृथ्वीचा हक्क हा एक कायदेशीर आणि न्याय शास्त्रीय सिद्धांत आहे. आणि हा हक्क मूलभूत अशा स्वरूपाचाच आहे. तो मानवी हक्कांच्या संकल्पनेप्रमाणेच परिस्थितीकी तंत्र आणि प्रजातींशी संबंधित असलेल्या मूलभूत संबंधांवर आधारलेला आहे. कोणत्याही गोष्टीवर हक्क किंवा मालकी प्रथमतः ती वस्तू ज्याने मिळवली, प्राप्त केली, धारण केली, आहे त्याचाच असतो. या पृथ्वीचे अस्तित्व अगदी अनादी अनंत काळापासूनचे आहे. पृथ्वीवरील आपले म्हणजे मानवाचे अस्तित्व केवळ काही वर्षांपूर्वीचेच मर्यादित आहे.
मानवाच्या अस्तित्वानंतरच खऱ्या अर्थाने त्याचा मालकी हक्क प्रस्थापित झाला. त्याप्रमाणेच पृथ्वीच्या अस्तित्वापासून, जन्मापासूनच तिचा मालकी हक्क प्रस्थापित होत असतो. याला पुरावा द्यायचेच म्हटले तर सिग्मंट फ्राईड यांनी म्हटले आहे की, केवळ दोन वैज्ञानिक शोधांमुळे लोकांच्या मानसिकतेमध्ये अमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. आणि त्यातील पहिला शोध म्हणजे पृथ्वी हे विश्वाचे केंद्र नाही आणि दुसरा शोध म्हणजे पृथ्वी ही साडेचार कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेली असून, मानव हा पृथ्वीवर काही लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला आहे. याचाच अर्थ असा की मानवी अस्तित्व येण्यापूर्वी कितीतरी वर्ष अगोदर पृथ्वीची निर्मिती झालेली आहे आणि यामुळे पृथ्वीवर मानवाचा हक्क नसून मानवावर पृथ्वीचा हक्क आहे हे स्पष्ट होते. कारण जो अगोदर येतो त्याचा नंतरच्या गोष्टींवर हक्क असतो.
वरील स्पष्टीकरण साठी काही पुरावे देता येतील. पहिला पुरावा म्हणजे निसर्गाने मानव पुरुषांची प्रजनन यंत्रणा तयार करताना त्यावर केलेला अन्याय होईल निसर्गातील इतर प्राणी बेडूक आणि मासे या थंड रक्तांच्या प्राण्यांचा तसेच हत्ती सारख्या गरम रक्ताच्या प्राण्याचा विचार केल्यास त्यांचे अवयव सुरक्षित रित्या ठेवता येईल अशी रचना निसर्गाने केलेली आहे मात्र मानवासाठी अशा कुठल्याच प्रकारची रचना निसर्गाने केलेली दिसून येत नाही.
दुसरा पुरावा देता येईल की निसर्गातील सर्व मानव प्राण्याचा पाठीचा कणा हा वक्र स्वरूपाचा आहे चतुष्पाद प्राण्यांना तिरकस पद्धतीचे मणके असतात. याबाबतीत माणूस मात्र अपरिपक्व मानला जातो कारण त्याचा पाठीचा कणा ताठ असतो. यामुळे त्याला सतत पाठदुखीचा त्रास सहन करावा लागतो.
तिसरा पुरावा देता येईल की मानवी डोळ्यातील ब्लाइंड स्पॉट. डोळे झाकल्यानंतर प्रकाश न मिळाल्याने मनुष्य दृष्टीने अंध होतो. परंतु आपल्यासारखीच रचना असलेल्या ऑक्टोपसचा विचार केल्यास त्याच्या डोळ्यांच्या पापण्या त्याच्या दृष्टीत कोणताही अडथळा निर्माण करत नाही. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे ब्लॅक प्लॉटचा त्रास नसतो.
चौथा पुरावा देता येईल की मानवी श्वसन यंत्रणा ही अत्यंत वाईट रित्या डिझाईन करण्यात आलेला आहे. मानवाचा अन्नग्रहण पाणी पिणे आणि श्वासोच्छ्वास प्रक्रिया या एकाच मार्गाने होत असतात चुकून अन्न श्वासनलिकात जाण्याची शक्यता असते. यामुळे गुदमरून मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
पाचवा पुरावा म्हणजे मानवी शरीरामध्ये व्हिटामिन 'सी' तयार करण्याची कुठल्याही प्रकारची यंत्रणा दिसून येत नाही. त्याला त्यासाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहावे लागते.
हे सर्व पुरावे मानवाच्या अगोदर विशालकाय डायनासोर सारखे प्राणी पक्षी अस्तित्वात होते. हेच स्पष्ट करते. मानव हा त्यांच्यानंतर अस्तित्वात आला. चतुष्सपाद माकडापासून त्याची निर्मिती झाली. हे स्पष्ट करतात.
आपली पृथ्वी ही जैविक आणि अजैविक या दोन प्रमुख घटकांनी बनलेली एक विशाल परिसंस्था आहे. वातावरण हे जमीन आकाश वायू बाष्प पाणी या पाच घटकांनी बनलेले आहे यामध्ये आपण लहान-मोठे आणि जैव अजैविक घटकांमध्ये जगत आलो आहोत.
आपण पृथ्वीच्या मालकी हक्का विषयी बोलत असतांनाच खरा प्रश्न निर्माण होतो की या पृथ्वीला असलेले हक्क कोणते.
विषयाची मर्यादा लक्षात घेता आपण थोड्या काही नैसर्गिक हक्कांची माहिती घेणार आहोत. पहिला हक्क म्हणजे जीवनाधिकार (right to live) ज्याप्रमाणे मानवाला जीवन जगण्याचा हक्क आहे त्याप्रमाणेच या पृथ्वीला सुद्धा आपले अस्तित्व म्हणजे जीवन जगण्याचा, अस्तित्व टिकवून ठेवण्याचा हक्क आहे. परंतु आजच्या मानवाने विकासाच्या नावाखाली या हक्कावर गदा आणलेली दिसून येत आहे. यामुळेच आपल्या भावी पिढीसाठी हे पृथ्वीचे अस्तित्व असेच टिकून राहील का ? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला दिसून येतो.अवैध वृक्षतोड जलवायू यामध्ये केली जाणारी छेडछाड यामुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.
पृथ्वीचा दुसरा महत्त्वाचा हक्क म्हणजे यातनांपासून मुक्तता( freedom from torture) पृथ्वीवरील जे जैविक आणि अजैविक घटक आहेत या घटकांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न आजच्या मानवाने केलेला दिसून येतो. यामुळे अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना आज आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. यातून या पृथ्वीचा चाललेला अमानुष छळ आपण क्षणोक्षणी अनुभवत आहोत. यामुळे या पृथ्वीला अनेक यातना होत आहेत. या यातनांपासून मुक्ती मिळवणे हा तिचा अधिकार आहे.
पुढील हक्क आपल्याला सांगता येईल तो म्हणजे विविध प्रथा परंपरांचा संस्कृतीचा ठेवा जपून ठेवण्याचा हक्क. प्रत्येक माणूस जात आपल्या विविध परंपरा आणि संस्कृतींचा ठेवा जतन करून ठेवत असतो. त्याप्रमाणे पृथ्वीवर सुद्धा विविध प्रकारच्या नद्या, पर्वत, झाडी, वृक्ष, प्राणी, संपदा आणि त्यांच्या विविध संस्कृती अस्तित्वात आहे. या सर्वांचा ठेवा जपून ठेवण्याचा अधिकार तीला आहे.
पृथ्वीवरील नद्यांना नद्यांचे अधिकार म्हणजे नदीचे पाणी स्वच्छ राखण्याचा तिला हव्या त्या पद्धतीने वाहू देण्याचा अधिकार तीला आहे परंतु मानवाने स्वसार्थासाठी त्यामध्ये बदल घडवून नदीचा प्रवाह बदलण्याचा, नद्यांमध्ये उद्योगधंद्यांच्या सांडपाण्याचा प्रवाह सोडण्याचा अनाठायी प्रयत्न करताना दिसत आहे. यामुळे आज पृथ्वीवरील पाणी दूषित होऊन पिण्यायोग्य पाणी अस्तित्वात नसल्याचे दिसून येत आहे.
पृथ्वीवरील पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे अधिकार पक्षांना आणि प्राण्यांना आपला मुक्त संचार करण्याचा हक्क आहे. त्यांना आपले अन्न पाणी मिळवण्याचा हक्क आहे मात्र एकमेव तज्ञ बुद्धी असलेल्या प्राण्याने त्यांच्या जगण्यावर घाला घालून प्राणी आणि पक्षांची कत्तल करण्यापर्यंत त्याची मजल गेली दिसून येते.
पृथ्वीलाही आपली नैसर्गिक साधन संपत्ती जतन करून ठेवण्याचा अधिकार आहे. मात्र मानवाने विकासाच्या नावाखाली पृथ्वीच्या पोटातील विविध प्रकारचे धातू खनिजे यांचे मोठ्या प्रमाणावरील उत्खनन करून पृथ्वीवरील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास घडवून आणलेला दिसून येत आहे.
काल मर्यादा लक्षात घेता शेवटी एवढेच म्हणावे लागते की, मानवाच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या विरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार त्याला प्राप्त झालेला आहे. मात्र आम्ही ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीला आपल्याच हक्कांच्या होणाऱ्या पायमल्लीच्या विरुद्ध दाद मागण्याचा अधिकार नसलेला दिसून येत आहे. आणि तो तिने मागावा तरी कोणाकडे ? यामुळेच आज विविध अक्राळविक्राळ रूप ही पृथ्वी घेताना आपल्याला दिसत आहे. विविध भागांमध्ये अचानक होणारे पर्यावरण बदल, हिमस्खलन, अतिवृष्टी, पूर, हिमवृष्टी ,वादळे, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, सुनामी, साथीचे आजार अशा विविध स्वरूपातून ती आपला हक्क तर मागून घेत तर नसेल ना ?
आणि म्हणूनच पृथ्वीचा मानवावर हक्क आहे.त्यांनीच तिच्या हक्कांचे संरक्षण करणे हाच त्याचा मूलभूत आणि नैसर्गिक अधिकार आहे. हेच ठासून सांगावंस वाटते. नुकत्याच लागलेल्या आठव्या खंडाच्या शोधामुळे मानवाच्या अस्तित्वा अगोदर पृथ्वीचे अस्तित्व होते. त्यामुळे तिचाच मानवावर हक्क आहे. हेच निर्विवाद त्रिकालाबाधित बाधित सत्य आहे. याची पदोपदी जाणीव होते.
मानवांनो माणुसकीला जागा
पृथ्वीच्याही हक्काला जागायला शिका
शेवटी स्वतःच्या आणि भावी पिढीच्या अस्तित्वासाठी आपण या पृथ्वीच्या हक्कांच संरक्षण करू या .
टिप्पण्या