पोस्ट्स

# पृथ्वीचाच मानवावर हक्क आहे मानवाचा पृथ्वीवर हक्क नाही

 पृथ्वीवर आपला हक्क नाही पृथ्वीचाच आपल्यावर हक्क आहे.                हो खरं वाचताय तुम्ही. पृथ्वीचा हक्क हा एक कायदेशीर आणि न्याय शास्त्रीय सिद्धांत आहे. आणि हा हक्क मूलभूत अशा स्वरूपाचाच आहे. तो मानवी हक्कांच्या संकल्पनेप्रमाणेच परिस्थितीकी तंत्र आणि प्रजातींशी संबंधित असलेल्या मूलभूत संबंधांवर आधारलेला आहे. कोणत्याही गोष्टीवर हक्क किंवा मालकी प्रथमतः ती वस्तू ज्याने मिळवली, प्राप्त केली, धारण केली, आहे त्याचाच असतो. या पृथ्वीचे अस्तित्व अगदी अनादी अनंत काळापासूनचे आहे. पृथ्वीवरील आपले म्हणजे मानवाचे अस्तित्व केवळ काही वर्षांपूर्वीचेच मर्यादित आहे.                 मानवाच्या अस्तित्वानंतरच खऱ्या अर्थाने त्याचा मालकी हक्क प्रस्थापित झाला. त्याप्रमाणेच पृथ्वीच्या अस्तित्वापासून, जन्मापासूनच तिचा मालकी हक्क प्रस्थापित होत असतो. याला पुरावा द्यायचेच म्हटले तर सिग्मंट फ्राईड यांनी म्हटले आहे की, केवळ दोन वैज्ञानिक शोधांमुळे लोकांच्या मानसिकतेमध्ये अमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. आणि त्यातील पहिला शोध म्हणजे ...